जीवन यात्रे सवे संपली धांदल गडबड,
उरलेल्यांची आणि उडाली धांदल गडबड.
ओढत होतो रहाट गाडे संसाराचे,
चाकच तुटले आणि उडाली धांदल गडबड.
माणूस होता किती चांगला किती म्हणती,
'जाण्याची' का केली त्याने धांदल गडबड!
अंतर्यामी ज्ञान प्रवाहित होते तेव्हा,
शब्दांची मग संपत जाते धांदल गडबड.
तारुण्याच्या मस्ती मधला कैफ आगळा,
शैशवकाळी नुसती असते धांदल गडबड.
==========================
उरलेल्यांची आणि उडाली धांदल गडबड.
ओढत होतो रहाट गाडे संसाराचे,
चाकच तुटले आणि उडाली धांदल गडबड.
माणूस होता किती चांगला किती म्हणती,
'जाण्याची' का केली त्याने धांदल गडबड!
अंतर्यामी ज्ञान प्रवाहित होते तेव्हा,
शब्दांची मग संपत जाते धांदल गडबड.
तारुण्याच्या मस्ती मधला कैफ आगळा,
शैशवकाळी नुसती असते धांदल गडबड.
==========================
सारंग भणगे