शांत तेवते मनात वात एक मंदशी
आत सांडता प्रकाश होय हर्ष मानसी
शांतता निनादता मनास स्थीरता मिळे
विश्व जाणते अशा नरोत्तमास तापसी
ज्ञान ग्रंथ वेद वाक्य ज्ञात त्यास देव ना
वेसणात बांधतो तरी विकार वासना
वेष्टनात बांधले शरीर तुच्छ मानतो
साधना उपासनेत खर्च सर्व चेतना
चित्त फाटते कधी बघून दीनदु:खिता
काळजातुनी फुटे अपूर्व काव्यसंहिता
सार साधनेतले सुबोधवाक्य सांगतो
शब्द त्यास की म्हणू जणू अमोघ अमृता
वाढताच व्यग्रता अलिप्त होउनी बसे
कूर्मतत्व बाणुनी सुषुप्त तृप्त होतसे
आत्मभान जागतां अनेक दीप पेटती
अंतरातला प्रकाश सर्वदूर जातसे
आत सांडता प्रकाश होय हर्ष मानसी
शांतता निनादता मनास स्थीरता मिळे
विश्व जाणते अशा नरोत्तमास तापसी
ज्ञान ग्रंथ वेद वाक्य ज्ञात त्यास देव ना
वेसणात बांधतो तरी विकार वासना
वेष्टनात बांधले शरीर तुच्छ मानतो
साधना उपासनेत खर्च सर्व चेतना
चित्त फाटते कधी बघून दीनदु:खिता
काळजातुनी फुटे अपूर्व काव्यसंहिता
सार साधनेतले सुबोधवाक्य सांगतो
शब्द त्यास की म्हणू जणू अमोघ अमृता
वाढताच व्यग्रता अलिप्त होउनी बसे
कूर्मतत्व बाणुनी सुषुप्त तृप्त होतसे
आत्मभान जागतां अनेक दीप पेटती
अंतरातला प्रकाश सर्वदूर जातसे
======================
सारंग भणगे (२९ मार्च २०२०)