अंतरात ज्ञानाला आरपार शोधावे
कोपरे नि कंगोरे तास तास तासावे
आतल्या निनादांचे शांत सूर ऐकावे
धाडतील स्वत्वाचे देवदूत सांगावे
बाह्यरूप विश्वाचे मोहलिप्त छायेचे
पांघरूण आत्म्याला नाशवंत कायेचे
पारतंत्र्य देहाचे जाणताच तू होशी,
मुक्त दूर जावोनी रागरंग मायेचे
दे मला अशी भक्ती दूर सार आसक्ती
ना अहं असूया वा वासना कि अतृप्ती
अमृतस्य पुत्रोऽहं हेच ब्रीद गुंजावे
आत्मलीन होण्याची दे असीम तू शक्ती
========================
सारंग भणगे (१४ एप्रिल २०२०)