ह्रदयात साचलेले
सारे तीला कळाले,
पाहून स्मित ओठी
सारे मला मिळाले.
पाण्यात पाहणारे
सारे उगा जळाले,
बेडीत गुंतताना
सारे मला मिळाले.
घेता कवेत तिजला
देहभानही पळाले,
वणव्यात पोळताना,
सारे मला मिळाले.
लावण्य पाहुनी ते
शशी चांदणे गळाले,
चिडवून त्यास थोडे
सारे मला मिळाले.
==========
सारंग भणगे. (८ ऑक्टोबर २०१०)
No comments:
Post a Comment