ते रस्त्यावरचे खड्डे
तसेच ठेवत जा,
आयुष्यातले खड्डे कोण बुजवतो!
मग तुम्ही तरी ते का बुजवावेत!!
आमच्या मुलांना खडतर आयुष्याची,
आणि खड्ड्यातील रस्त्यांची
सवय होईल तेवढीच
तसेच ठेवत जा,
आयुष्यातले खड्डे कोण बुजवतो!
मग तुम्ही तरी ते का बुजवावेत!!
आमच्या मुलांना खडतर आयुष्याची,
आणि खड्ड्यातील रस्त्यांची
सवय होईल तेवढीच
चुकून एखादा रस्ता
साफ सरळ असलाच
तर स्पीड ब्रेकरचे
अडथळे उभे करायचे विसरू नका,
आयुष्यात यशाची गाडी भरधाव निघालीच
तर मधून थांबायचे असते
असा धडा गिरवतील आमची मुले
ते ओव्हरब्रिज मात्र कसे
तुंबलेल्या रहदारीच्या वरून नेतात
आणि आमचा मार्ग सुकर करतात
असे ओव्हरब्रीजसुद्धा
आयुष्यात येतात,
हे कळू दे आमच्या मुलांना,
जगण्याचा आशावाद वाढेल थोडा त्यांचा....
साफ सरळ असलाच
तर स्पीड ब्रेकरचे
अडथळे उभे करायचे विसरू नका,
आयुष्यात यशाची गाडी भरधाव निघालीच
तर मधून थांबायचे असते
असा धडा गिरवतील आमची मुले
ते ओव्हरब्रिज मात्र कसे
तुंबलेल्या रहदारीच्या वरून नेतात
आणि आमचा मार्ग सुकर करतात
असे ओव्हरब्रीजसुद्धा
आयुष्यात येतात,
हे कळू दे आमच्या मुलांना,
जगण्याचा आशावाद वाढेल थोडा त्यांचा....
पण त्यातही
असे ओव्हरब्रीज पूर्ण व्हायला
कैक वर्ष लागतात
हे कळून
धीर (म्हणजे पेशन्स),
आणि संयम ह्याची संथा
तुमचे हे संथ काम त्यांना देईल
तुम्ही बांधलेले -
१. ग्रेड सेपरेटर
ऑफिसातली हायरार्की शिकवतील,
२. डिव्हाईडर
व्यवहारातील असमानता शिकवतील,
३. झेब्रा क्रॉसिंग
वंचितांना देखील रस्ता असतो असे शिकवतील
(भले प्रस्थापितांनी
त्याची फिकीर न बाळगण्याचे प्रशिक्षण
सुजाण नागरिक देतीलच)
४. फुटपाथ
ही सुविधा ‘वेगळ्याच’ सोयीसाठी असते हे शिकवतील
५. सिग्नल
स्टिअरिंग हातात असलं तरी, नियमन करणारा कुणी अज्ञात असतो
ह्याच भान देतील
आणि शेवटी
६. लॅंपपोस्ट
सगळाच काही अंधार नाही याची ग्वाही देतील
तुमचे हे रस्ते खूSSSप काही शिकवतील!
==========================
सारंग भणगे (२६ जून २०१७)
No comments:
Post a Comment