तुझ्यावाचून मला जराही करमत ना ही
तुला करमते म्हणून मी ते सां गत नाही
घड्याळातले काटे फिरती सतत निरंतर
तुझ्यावाचून काळ पुढे पण सरकत नाही
अवकाशाहुन अपार मोठी आहे कविता
चिमटीमध्ये माझ्या इवल्या मावत नाही
कधी तृणांवर हुळहुळणारा अल्लड वारा
होउ शकतो कसा वावटळ समजत नाही
कुणी न व्हावे उजाड इतके कोळपलेले
काळजातही आता काही उगवत नाही
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल वि ठ्ठल विठ्ठल
शब्दामधून पाझरतो पण झिरपत नाही
=========================
सारंग भणगे (१० नोव्हेंबर २०१७)