Saturday, May 24, 2008

पुन्हा एक.............

पुन्हा एक संध्याकाळ अशीच निघून जाणार,
आठवांची पिसाट सर मनात पडून जाणार

घेतील मनात जन्म काही वेडगळ आशा,
आशेत वाढलेली वने अशीच जळून जाणार.

फुटतील ओठात माझ्या काही फुटकळ शब्द,
सार्या भावना मात्र अशाच गळून जाणार.

उरतील खिन्न स्मृती रेंगाळतील मनामध्ये,
हृदय सार्या स्मृती अशाच पिळून जाणार.
============================
सारंग भणगे (१९९८)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...