Sunday, February 22, 2009

हर्षदा

निरागसतेचे वन घनदाट
नवसृजनाची सुंदर वाट
भावतरलता हळव्या लता
बेटावरती या तल्लीनता

प्रगल्भतेचे वाहती वारे
प्रतिभेचे ते शिंपले सारे
शांत शीतल छायेखाली
हिरवळ माया मखमाली

बेट हे सारे निसर्ग सुंदर
काव्यजलाचा वाहे निर्झर
या बेटाच्या अंतरी विमळ
फ़ुले हर्षदा विशुद्ध कमळ
==================
सारंग भणगे. (21 फ़ेब्रुवारी 2009)

1 comment:

Harshada Vinaya said...

तूझी कविता वाचून मी हिरवी हिरवी झाले कि काय असे वाटायला लागले.. लगेच जाऊन आरश्यात पाहीले एखादा कोंब फ़ूटलाय का?/ [;)]

Related Posts Plugin for WordPress, Blogger...