नदीकाठी तीला ।
भेटलो सखीला ।
आनंदे लिहीला ।
प्रेमपाठ ॥
तीच्या मुखावरी ।
भाव कितीतरी ।
नजरा गोंजारी ।
एकमेका ॥
बटांचे झुलणे ।
वा-याने हलणे ।
त्यांची नि वळणे ।
जीव घेती ॥
गाली गोड हसू ।
खळी लागे दिसू ।
नको आता रुसू ।
प्राणसखे ॥
तुझे ते असणे ।
तुझे ते हसणे ।
तुझे ते दिसणे ।
मोहमयी ॥
आता नको जीणे ।
सखे तुझ्या वीणे ।
अवघे माझे जीणॅ ।
तुझे होवो ॥
========
सारंग भणगे.
(२४ डिसेंबर २००९)
No comments:
Post a Comment