Monday, January 9, 2012

जीवनभिक्षा

तृषार्त नदीची जीवनभिक्षा
तुडुंब तोय तरी तितिक्षा
सूर्य परंतु अस्तंगत मी
अस्तित्वाची मला प्रतिक्षा.

भग्न नगरी सुंदर वेशी
नंदनवन हे तरी उपाशी
जळात रहावे राजहंस नि
चातक पाही रूक्ष अकाशी.

छाया-वड तो उन्हात जळतो
पाऊस धो धो पुरात गळतो
अवर्षणकाळी माध्यान्हीला
कृष्णमेघ वेडावुनी पळतो.

अमाप मोहर झडून गेला
पाऊस अकाली पडून गेला
डोंब मेला प्रेताचा त्या
सांगाडाही सडून गेला.

- सारंग भणगे

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...