हासली ती का मला तो भास झाला,
हाय दोन्ही कल्पनांचा त्रास झाला.
काल त्याला पाहिले जादूच झाली
तोच आता जीवनाचा श्वास झाला.
बाहुपाशी ज्या सखीच्या धुंद झालो,
बायको होताच त्याचा फास झाला.
नाच गाणी लाज लज्जा सोडलेली,
त्यात भक्ती आणली की रास झाला.
देवकीचा तान्हुला पाळे यशोदा,
मातृप्रेमाचा नव्हे हा ऱ्हास झाला.
जीवघेण्या यौवनाच्या स्वामिनीचा,
जीव घेण्या काळ जाता दास झाला.
-------------------------------------------
सारंग भणगे. (६ मे २०१२)
हाय दोन्ही कल्पनांचा त्रास झाला.
काल त्याला पाहिले जादूच झाली
तोच आता जीवनाचा श्वास झाला.
बाहुपाशी ज्या सखीच्या धुंद झालो,
बायको होताच त्याचा फास झाला.
नाच गाणी लाज लज्जा सोडलेली,
त्यात भक्ती आणली की रास झाला.
देवकीचा तान्हुला पाळे यशोदा,
मातृप्रेमाचा नव्हे हा ऱ्हास झाला.
जीवघेण्या यौवनाच्या स्वामिनीचा,
जीव घेण्या काळ जाता दास झाला.
-------------------------------------------
सारंग भणगे. (६ मे २०१२)
No comments:
Post a Comment