पडेल का हवे तसेच दान एकदा तरी?
जमेल का कधी गझल महान एकदा तरी?
सखे, तुझ्या मनास जिंकण्या विडाच घेतला,
तुझ्या मुखात रंगु देत पान एकदा तरी.
पिऊन रूप चांदणे अवीट लाघवी तिचे,
अता तरी मिटेल का तहान एकदा तरी.
प्रदीर्घ रात्र वाटते तुझ्या विना मला प्रिये,
कुशीत ये नि वाटु दे लहान एकदा तरी.
अखेर रंगलीस तू कवेत माझिया सखे,
घडेल का असे खरे निदान एकदा तरी.
==========================
सारंग भणगे. (२० डिसेंबर २०१२)
No comments:
Post a Comment