सारेच कोसळावे
आता असेच व्हावे
कोणास ना टळावे
आता असेच व्हावे
माझ्या कलेवराला
जाळून त्या झळांनी
थोडे तुम्ही
जळावे आता असेच व्हावे
ह्या एकटेपणाची
शिक्षा दिली जयांनी,
त्यांना हि ते
छळावे आता असेच व्हावे
वैषम्य हेच की
ते माझ्याच आतड्याचे
हे त्यांसही
कळावे आता असेच व्हावे
ना मारले कि
त्यांनी मज तारलेहि नाही
निष्क्रिय
पाघळावे आता असेच व्हावे
(आहे पतंग वेडा माझ्याच मी दिव्यांचा
माझ्यात मी
जळावे आता असेच व्हावे)
---------------------------------------------
सारंग
भणगे (१६ डिसेंबर २०१३)
No comments:
Post a Comment