तू प्रकाशवाट बनून आलास
आयुष्यात माझ्या,
आता प्रकाशलाट बनून ये,
आणि मला वाहून ने
एका प्रकाशाच्या अंतिम असीम सागरविश्वात!
पण खरंतर मीही आहेच एक प्रकाश थेंब
त्याच मूलद्रव्यांनी बनलेला
ज्यांनी तो विशाल सागर बनलेला
फक्त त्याच्यात आहे एक विलक्षण विशालकाय सामुद्रिक शक्ती
ज्या शक्तीचा अंश मी देखील होऊ शकतो
जेव्हा मी त्या प्रत्येक प्रकाश थेंबाशी
अद्वैत रुपात सायुज्य होऊन जातो
आणि मग मी माझ्या अस्तित्वातून मुक्त होऊन
एका असीम शक्तीच्या अस्तित्वात विलीन होऊन जातो
पुन्हा कधीही विभक्त न होण्यासाठी...
मानवाने टेस्ट ट्यूब मधून माझे पृथक्करण न करेपर्यंत
- सारंग

No comments:
Post a Comment