(ह्या कथानकातील सर्व पात्र काल्पनिक आहेत.
त्यांचा प्रत्यक्ष जीवनातील कुठल्याही व्यक्तींशी संबंध आढळल्यास, तो.......
निव्वळ योगायोग समजू नये!
कारण अशी पात्रे आपल्या आसपास पुष्कळ भेटतील!)
## १ ##
१९ जानेवारी २००८, रात्री ११ वाजता –
११ वाजले तरी आज बायको झोपायला तयार नव्हती.
माझा जीव मात्र इकडे वर खाली होत होता.
नेहा साडे अकरा – पावणे बारा पर्यंतच online
असते ना!
आज ऑफिसचे काही काम करायचे आहे असे सांगून मी
दुसऱ्या खोलीत गेलो आणि laptop उघडून बसलो.
नेहा online दिसली. तिला Hi करेपर्यंत छातीत
ठोके जोरात वाजू लागले होते. तिचा reply लगेच आला नाही. मी बेचैन होत होतो. एकटक
screen कडे बघत होतो, पण मध्ये मध्ये बिचकत बायको इकडे तर येत नाही ना ह्याचीही
खात्री करत होतो.
१ मिनिट...२ मिनिट्स...३ मिनिट्स नंतर नेहाचा
Hi आला, आणि मला हायसं वाटलं!
नंतर अर्धा तास मी आणि नेहा chat करत होतो.
मध्ये बायको झोपायला निघून गेलेली, मनातल्या मनात मला guilty feel होत होते, पण नेहाशी
बोलण्यातली धुंदी मला बाहेर पडू देत नव्हती. अर्धा तास नेहाशी chat करून मग
झोपायला जाताना ........खूSSपच excite झालेलो होतो....
## २ ##
२५ जानेवारी २००८, रात्री पावणे बारा –
उद्या सुट्टी असल्याने आज बराच वेळ रात्री chat
करता येईल असे वाटले, पण.......बायकोलाही सुट्टी असल्याने ती खूप वेळ जागीच
राहिली. मनातल्या मनात चरफडत मला तिच्या बरोबर टीव्ही पाहत बसावे लागले.
शेवटी मी वैतागलो कि हि का जात नाही झोपायला
म्हणून! आणि त्याची परिणती उगाच कारण उकरून काढून तिच्याशी भांडण्यात झाली. शेवटी आम्ही
दोघेही झोपलो ....... विरुद्ध दिशेला तोंड करून...
## ३ ##
२६ जानेवारी २००८, रात्री साडे दहा –
बायको आज लवकर झोपल्याने मी चटकन मेसेंजर वर
आलो. नेहा नव्हती. थोडा वेळ तिची वाट पाहत राहिलो, पण बहुदा ती येईल असे वाटत
नव्हते. बेचैनी वाढत होती.
शेवटी मी आज chat room वर जायचे ठरवले. मग एक
खोटा id create करून, public rooms वर गेलो. एका पाठोपाठ तिथे असलेल्या सर्व
female profile वर टिचकी मारत मेसेज पाठवत राहिलो.
बराच वेळ खटपट करूनही कुणी respond
करेना.......आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली.......
मी एक खोटा female profile बनवला......नेहा
नावाने, आणि मग माझ्याशी बोलू पाहणारे असंख्य भेटले....
त्या दिवशी रात्री ३ पर्यंत मी नेहा नावाने
chat करत राहिलो.........
## ५ ##
१० जून २०१२, गुरुवार –
आज सकाळी बस पुन्हा चुकली. मग धावपळ करत रिक्षा
stand ला गेलो, त्यात पाऊस सुरु झालेला. छत्री bag मध्ये ठेवायची असे रात्री लक्षात
आलेले, पण chat च्या नादात विसरून गेलो. पावसाने आणि घामाने भिजलेलो, कशीबशी
रिक्षा मिळाली, पण ऑफिसला late mark लागायचा तो लागलाच, ह्या आठवड्यात दुसऱ्यांदा!
दुपारी प्रचंड झोप येत होती. गेले तीन दिवस रोज
रात्री २-३ वाजता झोपत होतो. सकाळी उठवत नसताना उठायचे, बस साठी धावपळ करायची.
डोळे चुरचुरत असतात, डोके जड असते, मग काम नीट होत नाही, असे गेले २-३ दिवस चालले
होते.
म्हणजे असे बरेचदा व्हायचे हल्ली. रोज ठरवायचो
कि आज नाही chat करायचा, पण .......
आता मात्र नक्की कि पुढच्या आठवड्यापासून सर्व
काही बंद म्हणजे बंद
## ६ ##
२३ एप्रिल २०१३ –
घरी आल्यावर बायकोने जेव्हा ‘काय रे, काय झाल?
चेहरा का असा उतरलाय? बर वाटत नाहीये का?’ असे विचारले, तेव्हा रडूच फुटलं होत.
कसाबसा सावरून बाथरूममध्ये गेलो, आणि आवाज दाबत हमसाहमशी रडलो.
आज ऑफिसच्या presentation मध्ये झालेली गडबड
.......बॉसने सगळ्यांसमक्ष केलेला insult, आणि अगदी माझ्या juniors च्या नजरा
..... आणि ह्या सगळ्याच कारण एकच!
मला माझीच घृणा केव्हापासूनच वाटू लागली होतीच,
आज माझ्या आत्मविश्वासाचा कचरा झालाय! Oh God, how do I get rid of this addiction
of chatting
## ७ ##
१९ फेब्रुवारी २०१६ –
आज दीप्तीशी chat room वर भेट होऊन ३ महिने
झाले. आज तिचा वाढदिवस, म्हणून ती chat वर भेटण्याची शक्यता कमीच होती. पण मी
तरीही तिची वाट पाहत थांबणार होतो. वेळ जावा म्हणून तिच्या बरोबर केलेले ते रम्य
chats पुन्हा पुन्हा वाचत होतो.
किती जणींशी ....आणि जणांशी chat केला मी.... सगळा
नुसता romantic, sensuous, erotic and what not!
पण दीप्ती.....दीप्ती म्हणजे गडद अंधारातल्या
लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखी! तिचे विचार, जीवनाकडे बघायची दृष्टी, धडाडी सगळेच मला
आवडून गेले. असे वाटू लागले कि.....कि मी तिच्या प्रेमात पडलोय! बेचैन असतो
तिच्याशी बोलायला, पण हि बेचैनी इतर chat करण्यासाठी होणाऱ्या बेचैनीहून किती
वेगळी, किती positive वाटते!
तिच्यामुळे आता माझा chat खूपच कमी झालाय J
## ८ ##
१९ फेब्रुवारी २०१७
मागल्या वर्षी ह्याच दिवशी लिहिले होते ‘आता
माझा chat खूपच कमी झालाय’.
‘फार लवकर कुठली conclusions काढू नयेत’ दीप्ती
म्हणाली होती!
तीच सगळंच कस बरोबर असतं!
## ९ ##
११ सप्टेंबर २०१८ –
आज “nine by eleven”.
कोर्टाने divorce मंजूर केला. मी घरी आलो आहे.
सगळ घर भकास वाटतंय, आयुष्य भकास वाटतंय!
कुठून दुर्बुद्धी झाली आणि chat वरच्या त्या
Hunk4U प्रोफाईल ने पाठवलेली link open केली. बहुदा त्यातूनच ते malware laptop वर
install झालं असणार.
मग ती आलेली ransomware ची धमकी..... कि तुमचे
सगळे contacts, browsing history, camera sessions etc. copy केले आहे आणि ते
सगळ्या contacts ला publish करतील, जर bit coin मध्ये पैसे पाठवले नाहीत तर.
आता असे वाटते कि तेव्हाच ते bit coin पाठवले
असते तर कदाचित सुटलो असतो. भले ते illegal असो!
पण ignore केले त्याची शिक्षा म्हणजे सगळ्यांना
माझी सगळी online secrets mail झाली.....आणि मी बरबाद झालो, पूर्णत: ऑफिसच्या
contacts ला गेली म्हणून नोकरी गेली, cheating केले म्हणून बायको गेली, आई
वडिलांना तोंड दाखवायची जागा राहिली नाही, मित्रात इज्जत राहिली नाही.......
health ची वाट तर लागलेलीच, BP, dipression आणि
एक येऊन गेलेला heart attack.....
कुठे थांबायचे हे मला कळलेच नाही कधी.......पण,
पण आता थांबतो ...... कायमचा!
============================== ============================== ===================
सुरेलच्या गळ्यात फास २००८ सालीच अडकला होता,
आत्ता फक्त त्याची गाठ आवळली गेली!
- Sarang Bhanage (10 September 2018)
No comments:
Post a Comment