पाहते शून्यात कोठे राहूनी मौनात ती
काय झाले ते कळेना का अशी संदिग्ध ती
उद्ध्वस्त होते अंतरी थरकाप होतो का तिचा
आवाज मोठा ऐकता घामात होते चिंब ती
विश्वास ना दिसतो तिच्या वागण्या दिसण्यातही
हिंडते बस्स घेऊनी डोळ्यात लाखो प्रश्न ती
राग येतो रात्रीचा तिज व्यापितो अंधार का
ज्योत विझूनी अंतरीची का जाहली निस्तेज ती
लाडक्या बाबासही ना मारते मिठी ती आता
होता अचानक स्पर्श भिऊनी झिडकारते त्यांनाही ती
काय झाले ते कळेना का कळी कोमेजली
कोडे कटू सुटणार.. जेंव्हा .... काहीतरी बोलेल ती .........
© विश्वास रघुनाथ कुलकर्णी
---------------------------------------------------------------------------------------------
काय झाले ते कळेना का अशी संदिग्ध ती
उद्ध्वस्त होते अंतरी थरकाप होतो का तिचा
आवाज मोठा ऐकता घामात होते चिंब ती
विश्वास ना दिसतो तिच्या वागण्या दिसण्यातही
हिंडते बस्स घेऊनी डोळ्यात लाखो प्रश्न ती
राग येतो रात्रीचा तिज व्यापितो अंधार का
ज्योत विझूनी अंतरीची का जाहली निस्तेज ती
लाडक्या बाबासही ना मारते मिठी ती आता
होता अचानक स्पर्श भिऊनी झिडकारते त्यांनाही ती
काय झाले ते कळेना का कळी कोमेजली
कोडे कटू सुटणार.. जेंव्हा .... काहीतरी बोलेल ती .........
© विश्वास रघुनाथ कुलकर्णी
---------------------------------------------------------------------------------------------
विश्वास कुलकर्णी – (१) –
कविता क्र. ८
विश्वासजी,
आपण आपल्या ओळीचा आधार घेऊन
एका अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला आहे. अलीकडच्या काळात ह्या विषयावरील
कविता अधिकाधिक प्रमाणात वाचनात; ऐकण्यात येऊ लागल्या आहेत. अशाही कविता आता
लिहाव्या लागतात हे केवढे मोठे दुर्भाग्य आहे.
अशा कवितेचे रसग्रहण करावे
तरी कसे!
काय झाले ते कळेना हि ओळ
आपण आपल्या कवितेमध्ये अतिशय समर्पक योजली आहे आणि त्या ओळीत जो गर्भितार्थ आहे;
सूचितार्थ अभिप्रेत आहे तो मनाला अतिशय हेलावून टाकणारा आहे. ‘काय झाले ते कळेना’
हे म्हणत असताना काय झाले आहे ते कळते ते खरोखर दु:खद आहे!
तिच्या मौन रूपाचे वर्णन,
तिचे सतत भयभीत वागणे हे अतिशय संयत परंतु वास्तविक वाटणारे आणि मनाला घुसमटून
टाकणारे असे तुम्ही लिहिले आहे. हे वाचत असताना नकळत तिची अशी घुसमटलेली, मनातून
उध्वस्त झालेली, अंतर्बाह्य हादरलेली अशी एक अतिविदारक प्रतिमा नकळत डोळ्यापुढे
उभी राहते आणि ती मनाला हेलावून सोडते. कविता खूप अंतर्मुख करते, आपल्या
पुरुषत्वाची आपल्यालाच शिसारी वाटू लागते, अशा परिस्थितीतून जाणाऱ्या; गेलेल्या
बालीकांसाठी, स्त्रियांसाठी कुठेतरी मनात करुणा दाटतेच, परंतु तिच्यावर असे अघोरी
अत्याचार करणाऱ्या नराधमांना ठेचून त्यांचा सूड आपणच घ्यावा अशी चीड निर्माण होते,
मन अस्वस्थ होते....................... मनामध्ये अनेकविध भावनांचे प्रपात कोसळत
जातात, मनातच ते दगडावर आपटून फुटून छिन्नविछिन्न होतात.............. लिहिता
लिहिता ह्या विषयावर इतके लिहावेसे वाटू लागते कि आपल्या मनातून जणू शब्दांचे वादळ
ह्या कागदावर भिरभिरावे असे वाटू लागते! थांबतो!
आत्ताच मी सई परांजपेंचा ‘दिशा’
पहिला. त्या अतिशय सध्या चित्रपटातील काहीही न दर्शवता दाखवलेली स्त्रीत्वाची
विटंबना मनात प्रश्नचिन्हांची वावटळ निर्माण करून गेली होती कि इतक्यात तुम्ही
अशाच, किंबहुन त्याहून अधिक गंभीर विषयावर संयत कविता लिहिलीत. त्यामुळे मन थोडे
अधिकच सैरभैर झाले आहे.
इथे जे लिहिले आहे त्याला
रसग्रहण म्हणावे कि नाही ठाऊक नाही, जर मी काही असंबद्ध लिहिले असेल तर माफ करा.
परंतु तुमच्या कवितेमध्ये कुणाचेही मन सैरभैर करून टाकण्याची ताकद केवळ त्या
विषयाच्या गांभिर्यामुळेच नाही तर त्या कवितेच्या सशक्त मांडणीमुळेदेखील आहे असे
मला निक्षून इथे लिहावे वाटते. ह्याहून सुंदर आणि वाचनीय कविता असल्या तरी
संवेदनशील माणसाने हि तुमची कविता निश्चित वाचावीच असा माझा आग्रह निश्चित असेल!
No comments:
Post a Comment