Friday, July 28, 2017

चैत्रझुळूक

ती ओंजळ भरले पाणी
मी तहानलेला कोणी
ती जीवन देते तेव्हा
ओठांवर फुलती गाणी

मन-वन कधी सळसळते
ती किलबिल किलबिल करते
प्राजक्त सकाळी माझ्या
ती नभांगणी चमचमते

ती सांजनभाची शोभा
की मंद दिव्याची आभा
मन देऊळ माझे त्याच्या
ती गाभार्याचा गाभा

घनगर्द मनाची वनिता
तमजर्द निशांतक पलिता
नखशिखांत लावण्याची
ती आशयचूर कविता
---------------------------
सारंग भणगे (२८ जुलै २०१७)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...