Sunday, December 30, 2012

Poem on me

शब्दयोद्धा कल्पवृक्षा
दीर्घ प्रतिसाद दायका
जिजाऊ शिवराय भक्ता
लाडकया सारंग दा ॥१॥
.
तुझ्या ठाई कल्पनाशक्ती
तुझी कवितेवरती भक्ती
अगाढ तुझा शब्दसाठा
लाडकया सारंग दा ॥२॥
.
भाग्यवान कम्यूनिटी
तू जिचा सेनापती
आता क्षतीची ना भीती
लाडकया सारंग दा ॥३॥
.
नवनवे काढून विषय
वातावरण मंगलमय
तू कल्पनांचा विजय
लाडकया सारंग दा ॥४॥
.
जमविशी गाठीभेटी
तत्पर नेहमी मैत्रीसाठी
तूच शिक्षक तूच दोस्ता
लाडकया सारंग दा ॥५॥
.
काही नियम जरी चुकले
तू पटकन सांगितले
तुझ्यावरून कितीक शिकले
लाडकया सारंग दा ॥६॥
.
तू प्रेरणादाई शक्ती
तू मैत्रीची संपत्ती
तू दिलेस किती किती
लाडकया सारंग दा ॥७॥
.
स्क्रॅप योगे जिंकशी मने
फुलविशी विचार सुमने
आनंददायी तुझे असणे
लाडकया सारंग दा ॥८॥
.
हे सारंग वर्णन स्तोत्र
क्षद्देने जो सदा पठे
सदैव सर्व गुण संपन्न
मित्रसंपत्ती तया भेटे ॥९॥
.
॥ इति श्री ऑरकूट पुराणे कविता खंडे सारंग वर्णन स्तोत्र संपूर्ण ॥

- Tushar Joshi

1 comment:

Hemant said...

Though I know a little...or too little Marathi...but this one is the awesomest and simplest I have ever read...

Related Posts Plugin for WordPress, Blogger...