दरवळणारा गंध फुलांचा बागेमधुनि आला
त्या पुर्वेच्या रंगसकाळी जागे करूनि गेला
मरगळलेला आळस आता मागे पडुनि गेला
दरवळणारा गंध फुलांचा बागेमधुनि आला...
छोटी छोटी कळी होती आली फुलुन वेली,
पहाटवेळी डोलत होती बाला नवीनवेली,
रवीकिरणांचे त्या भ्रुलीशी धागे जुळुनि गेला.
दरवळणारा गंध फुलांचा बागेमधुनि आला...
त्या किरणांशी खेळत असता गाली चढली लाली
खेळीमेळी जोडगोळी अश्शी जमुन गेली
हिरमुसलेला वारा आणिक रागे पळुनि गेला.
दरवळणारा गंध फुलांचा बागेमधुनि आला...
====================
सारंग भणगे. (जानेवारी २०१०)
No comments:
Post a Comment