Sunday, May 9, 2010

तुच होती का तिथे?

चांदण्याचा स्पर्श होता नाचल्या लहरी जीथे
त्या तळ्याच्या गे किनारी..... तुच होती का तिथे?

तुच होती का तिथे गंSSS तुच होती का तिथे?

श्वेतवस्त्रे नेसलेली पुष्पमाला घातलेली;
कुंतलांची गर्द वेणी मोग-याने गुंतलेली.
बाग होती लाजलेली चालताना तु तिथे, [१]

तुच होती का तिथे गंSSS तुच होती का तिथे?

शीळ घाली रान वारा हालली वेलीफुले;
रोमरोमातून रात्री चांदणे व्योमी खुले.
चूर होता चंद्र वेडा पाहुनि तुजला तिथे, [२]

तुच होती का तिथे गंSSS तुच होती का तिथे?


नीलकांती त्या नभाला मेघकाळे वेढले;
दर्शनाच्या वासनेने ग्रीष्मकाळी ओढले.
पाहताना मोर वेडे नाचले का गे तिथे? [३]

तुच होती का तिथे गंSSS तुच होती का तिथे?

गाज होती आसमंती वेदनेची का तरी?
काळजाचे झाड होते बोडके गे का तरी?
भास होता तो तुझा गे तूच नव्हती का तिथे? [४]

तूच नव्हती का तिथे गंSSS तूच नव्हती का तिथे?
=======================
सारंग भणगे. (९ मे २०१०)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...