Saturday, May 15, 2010

सुख-दु:ख

सुखाच्या महाद्वारी; दु:खाचे पहारेकरी

सुखाच्या अंतरी; दु:खाचे मारेकरी

सुख बाहेर शोधावे; दु:ख आतून भेटावे

सुखाच्या दूर वाटा; दु:खाचा खोल वाटा

सुख असे जर बिंब; दु:ख प्रतिबिंब

सुख कोरडे कोरडे; दु:ख ओले चिंब

सुख ते मृगजळ; दु:ख ते वादळ

सुख पाहुणा असती; दु:ख जन्माचा सोबती

सुख हरवली गाय; दु:ख घराकडे पाय

सुख देवाची मुर्ती; दु:ख देवाची आरती

सुख मागून ना मिळते; दु:ख देऊन टाकते

सुख घडवी रावण; दु:ख घडवी जीवन.
===================
सारंग भणगे. (२००९)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...