काव्य जणू हे शीतल निर्झर
तुषार तयाचे उडती झरझर
तुषारात त्या न्हाऊन होई
आनंदोत्सव जगभर घरभर
नवसृजनाचा कोंभ पहिला
ऊगवताना अंकुर पाहिला
सिंचूनि त्यावर जलतुषार
धरतीला आनंद वाहिला
सर्वऋतूत सदा बहरावे
अजितानेही हसत हरावे
अजातशत्रू तुषारदा तो
काव्यप्रेरका सदा स्मरावे.
=================
सारंग भणगे. (1 मार्च 2009)
No comments:
Post a Comment