उठे आरोळी रानात
ईथे पेटला प्रकाश
रस्त्यारस्त्यातून वाहे
असा जागला माणूस
झाली पहाट सभोती
दिशाकोन उजळले
तम पाळले अंतरी
सारेसारे पाजळले
सृष्टी न्हाऊन नवेली
झाला विकास विकास
भेद संपले अवघे
एक झाला देश सारा
घराघरावरी आहे
एक हासरा चेहरा
एक आनंद कल्लोळ
दुजा प्रेमाचा सुवास
आज आहे ओठीपोटी
घास रोटीचा तृप्तीचा
माती कसण्या बांधवा
बीज ज्ञानाचा भक्तीचा
नदीनाल्यातून वाहे
तृप्त पायस पायस
==============
सारंग भणगे. (11 मार्च 2009)
No comments:
Post a Comment