एक हवा प्रियकर असा
प्रिय तो सर्वांस हवा
प्रीतीच्या पानावरी
रोज दंवाचा थेंब नवा
एक हवा प्रियकर असा
वादळातही उभा हवा
प्रीतनभातील जणू
अचळ शीतल चांदवा
एक हवा प्रियकर असा
ओथंबलेला सूर हवा
गात असता मी विराणी
आळवील जो मारवा
एक हवा प्रियकर असा
तेजाचा उन्माद हवा
रात्रीमधुनी नभोमंडली
'मित्र' हासरा उगवावा.
================
सारंग भणगे. (मार्च 9, 2009)
No comments:
Post a Comment