Saturday, March 7, 2009

संध्यारजनी

सोनसावळ्या सायंकाळी मधुर गीतांच्या पङ्क्ती
फ़ेर धरुनी खेळ खेळती कृष्णसावल्या संगती

नयनमनोहर रूप देखणे लाजरी जणू नवकांता
कधी कुणाच्या ऊरी सलते प्रियविरहाची चिंता

अद्भूत रंगीत देखाव्यांनी फ़िटे नेत्र पारणे
क्षितीजावरती मुग्ध खगांनी उभारली तोरणे

नक्षत्रांच्या नक्षीमध्ये चंद्र उभा हासरा
निशाकाशी मंद लहरे शशीरश्मी लाजरा

प्रणय देखता शशिता-यांचा रोमांचित यामिनी
अवगुंठून बसली उत्सुक भ्रुली नवकांता भामिनी

आठवणींच्या गवाक्षातूनि स्मृतीसमीर विहरतो
संध्यारजनी नित्य पाहूनि मनमयूर बहरतो
=================================
सारंग भणगे. (7 मार्च 2009)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...