गाते उगाच गाणे विसरुन शब्द गेले
ओठात गीत अजूनि सुचवून शब्द गेले
कुठूनि उगाच झोंबे वा-यास लाज नाही
कुठूनि रंग कपोली खुलवून शब्द गेले
झाकू तरी कसे मी वयभार चांदण्याचे
पीयुषात माखलेले बिखरुन शब्द गेले
सरल्या मिठीत काही मधुमंद गंधराती
वक्षात स्पंदनांचे बिलगुन शब्द गेले
===========================
सारंग भणगे. (16 मार्च 2009)
No comments:
Post a Comment