डोंगरघाट जीथे रानवाटेला भेटतो,
तीथे....
शिणलेली दुपार संध्येला भेटते,
तेव्हा....
सुस्त पानास कोवळि किरणे भेटतात,
तशी....
काळजाला स्पंदने भेटावीत
म्हणून....
काळाच्या अदृश्य पटलावर...
माझ्या भाळी...
तुझ्या अस्तित्वाचा क्षण..
मला..
भेटेल का??
----------
सारंग भणगे. (20 मार्च 2009)
No comments:
Post a Comment