उभे भग्न अवशेष
पाहतो भग्न डोळा
पाणथळ नयनात
ध्वस्ततेचा सोहळा
काळिज आक्रंदते
जुने दिस स्मरते
आभाळात हरवल्या
मेघांस ग शोधते
झाड पुन्हा बहरेल
स्वप्न वेडे नको पाहू
अवसेला चांदण्याचा
शोध घेत नको राहू
वाटा उजाड ओसाड
रान सारे करपले
उरलेल्या खुणांचे
मागही सारे संपले
============
सारंग भणगे. (14 मार्च 2009)
No comments:
Post a Comment