शिरीनला विषयाची समज जरा कमी
भांडायचे म्हटले तरी कौतुकाचीच हमी.
वेड्या घोड्यांसारखि नुसतेच उधळते
भांडणाच्या जात्यावर कौतुकाच दळते.
भांडणारे असावे लागतात, मुळातच जात्याचे
फ़ुलाला नसतात दात कोरफ़डीच्या पात्याचे
जाऊ दे कुठे भांडा, बसायची हमसून रडत
आणि उलट्या हाताने बोंब मारून ओरडत.
==================================
सारंग भणगे. (31 जानेवारी 2009)
सुंदर चित्रे सृष्टीमधली काव्य जणू हे भगवंताचे I कविता व्हावे जीवन आणि कवितेमधुनी जिवंत व्हावे II
Saturday, January 31, 2009
केव्हा तरी पहाटे
थोडा उजेड होता थोडी पहाट होती
तेजात भास्कराच्या उषा नहात होती
धाऊन सप्तवारू, उधळीत प्रकाश मोती
सहस्त्र किरणांच्या, उजळल्या अगणित ज्योती
क्षितीज तांबडे फ़ुटती, रंगात रंगीत रंगती
गगनाची निळी दुपटी, रविबाळ हासत रांगती
सकाळ झाली गोमटी, सुटली आकाशमिठी
लाजत पुर्वा दिठी, आरक्त होऊनि उठी.
==========================
सारंग भणगे. (डिसेंबर 2008)
तेजात भास्कराच्या उषा नहात होती
धाऊन सप्तवारू, उधळीत प्रकाश मोती
सहस्त्र किरणांच्या, उजळल्या अगणित ज्योती
क्षितीज तांबडे फ़ुटती, रंगात रंगीत रंगती
गगनाची निळी दुपटी, रविबाळ हासत रांगती
सकाळ झाली गोमटी, सुटली आकाशमिठी
लाजत पुर्वा दिठी, आरक्त होऊनि उठी.
==========================
सारंग भणगे. (डिसेंबर 2008)
साहित्य प्रकार:
कविता
Friday, January 30, 2009
सिगारेट
कानाखाली धूर काढला होता बापूनं
सिगारेट ओढली होती जेव्हा लपूनं
वाटलं होतं तेव्हा भारीच वाईट मला
ओठांच्या चुकीची शिक्षा का कानाला?
कानाला बसला फ़टका; चला ठीक आहे
झुरक्यात सिगारेटीच्या साला किक आहे
रविनापेक्षा सिगारेट चिज मस्त मस्त
माधुरीच्या पिक्चरहून हीचा झटका स्वस्त
पहिला कश घेतला अंगात आला गब्बर
छातीत धूर भरून गाढावही होतं बब्बर
लोक मारतात यडे सिगरेटवर फ़िलॉसॉफ़ी
जळून जाऊन आश(Ash) होणे; गोष्ट नाही सोपी
=============================
सारंग भणगे. (29 जानेवारी 2009)
सिगारेट ओढली होती जेव्हा लपूनं
वाटलं होतं तेव्हा भारीच वाईट मला
ओठांच्या चुकीची शिक्षा का कानाला?
कानाला बसला फ़टका; चला ठीक आहे
झुरक्यात सिगारेटीच्या साला किक आहे
रविनापेक्षा सिगारेट चिज मस्त मस्त
माधुरीच्या पिक्चरहून हीचा झटका स्वस्त
पहिला कश घेतला अंगात आला गब्बर
छातीत धूर भरून गाढावही होतं बब्बर
लोक मारतात यडे सिगरेटवर फ़िलॉसॉफ़ी
जळून जाऊन आश(Ash) होणे; गोष्ट नाही सोपी
=============================
सारंग भणगे. (29 जानेवारी 2009)
साहित्य प्रकार:
कविता
Saturday, January 24, 2009
नवीन भारत
नवीन भारत असा घडवु
सुवर्ण मुकुटी माणिक मढवु
भूमातेच्या चरणांवरती
नवसृजनाचा प्रसाद चढवु ॥1॥
आधुनिक होऊ शेतकरी
परंपरा तरी वारकरी
जोडू किनारे प्रेमाचे
नद्यांचेही कितीतरी ॥2॥
नको हिंसा नको दहशत
शत्रु उतता दावु ताकद
सदैव जागे राहुनि राखु
अपुली सीमा अपुली सरहद् ॥3॥
दास होऊया परिश्रमाचे
कर्तव्य निभावु चतुःश्रमाचे
होऊनि मुक्त व्यसनातुनि
मोह त्यागु विश्रामाचे ॥4॥
पोर दिसता कुणी उपाशी
कवळुनि घेऊ त्यास उराशी
कणवेने भरवुनि कवळ
मैत्र जोडुया करूणेशी ॥5॥
व्यवहार करु सचोटीने
काम करु हातोटीने
स्वच्छ करुया भ्रष्टाचारा
मानवतेच्या तुरटीने ॥6॥
नाठाळ नसे आप-परका
दोषी बंधुही रिपु सारिखा
सोडवु खटले थटलेले
न्यायात नको फ़क्त तारखा ॥7॥
उजळुन टाकू दिव्यभारती
भयमुक्त गाऊ काव्यभारती
पोलादाच्या कणखरतेने
नवी निर्मुया भव्यभारती ॥8॥
=================================
सारंग भणगे. (जानेवारी 2008)
सुवर्ण मुकुटी माणिक मढवु
भूमातेच्या चरणांवरती
नवसृजनाचा प्रसाद चढवु ॥1॥
आधुनिक होऊ शेतकरी
परंपरा तरी वारकरी
जोडू किनारे प्रेमाचे
नद्यांचेही कितीतरी ॥2॥
नको हिंसा नको दहशत
शत्रु उतता दावु ताकद
सदैव जागे राहुनि राखु
अपुली सीमा अपुली सरहद् ॥3॥
दास होऊया परिश्रमाचे
कर्तव्य निभावु चतुःश्रमाचे
होऊनि मुक्त व्यसनातुनि
मोह त्यागु विश्रामाचे ॥4॥
पोर दिसता कुणी उपाशी
कवळुनि घेऊ त्यास उराशी
कणवेने भरवुनि कवळ
मैत्र जोडुया करूणेशी ॥5॥
व्यवहार करु सचोटीने
काम करु हातोटीने
स्वच्छ करुया भ्रष्टाचारा
मानवतेच्या तुरटीने ॥6॥
नाठाळ नसे आप-परका
दोषी बंधुही रिपु सारिखा
सोडवु खटले थटलेले
न्यायात नको फ़क्त तारखा ॥7॥
उजळुन टाकू दिव्यभारती
भयमुक्त गाऊ काव्यभारती
पोलादाच्या कणखरतेने
नवी निर्मुया भव्यभारती ॥8॥
=================================
सारंग भणगे. (जानेवारी 2008)
साहित्य प्रकार:
कविता
Monday, January 19, 2009
खोट्या कविता
सुखशय्येवर बसून लिहीतो, कविता दुःखाच्या,
कसा तू फ़सव्या वर्माचा.
स्त्रीला घेऊन कवेत निजतो, गाई कविता मुक्तीच्या,
कसा तू भोगी चर्माचा.
करूणेचा ना लेशही बोलतो, स्तवन करूणेचे,
कसा तू भोंदू धर्माचा.
भाव असे ना उरी तरी आणतो, आव कवितेचा,
कसा तू ढोंगी मर्माचा.
==================================
सारंग भणगे. (16 जानेवारी 2009)
कसा तू फ़सव्या वर्माचा.
स्त्रीला घेऊन कवेत निजतो, गाई कविता मुक्तीच्या,
कसा तू भोगी चर्माचा.
करूणेचा ना लेशही बोलतो, स्तवन करूणेचे,
कसा तू भोंदू धर्माचा.
भाव असे ना उरी तरी आणतो, आव कवितेचा,
कसा तू ढोंगी मर्माचा.
==================================
सारंग भणगे. (16 जानेवारी 2009)
साहित्य प्रकार:
कविता
Friday, January 9, 2009
गझल
उठे पापणी जशी उठावी गझल
फ़ुटे स्मित ऐसे कि फ़ुटावी गझल
तुझे लाजणे अन् मला पाहणे
अशी स्फ़ुरणे, कि सुचावी गझल.
रंगात न्हाली ही पहाट झाली
आरक्त गाली कि फ़ुलावी गझल.
रजई धुक्याची दुलई दंवाची
मलई मिलनाची ही व्हावी गझल.
उरी स्पंद वेडे श्वास मंद सोडे
असा गंध ओढे कि निसटावी गझल.
पहाटे पहाटे कोवळ्या पहाटे
रोजच्या पहाटे ही स्फ़ुरावी गझल.
==============================
सारंग भणगे. (9 जानेवारी 2008)
फ़ुटे स्मित ऐसे कि फ़ुटावी गझल
तुझे लाजणे अन् मला पाहणे
अशी स्फ़ुरणे, कि सुचावी गझल.
रंगात न्हाली ही पहाट झाली
आरक्त गाली कि फ़ुलावी गझल.
रजई धुक्याची दुलई दंवाची
मलई मिलनाची ही व्हावी गझल.
उरी स्पंद वेडे श्वास मंद सोडे
असा गंध ओढे कि निसटावी गझल.
पहाटे पहाटे कोवळ्या पहाटे
रोजच्या पहाटे ही स्फ़ुरावी गझल.
==============================
सारंग भणगे. (9 जानेवारी 2008)
साहित्य प्रकार:
गझल
Wednesday, January 7, 2009
अंश
मी निघालो प्रकाशमार्गे
तीमिराचे तुम्हा किनारे
भक्ती हीच शक्ती माझी
अन्य साधना विना रे ।।१।।
भौतीकाचे शोध तुमचे
नवल तुम्हा विज्ञानाचे
आनंदाचा उपासक मी
शौक माझे अन् ज्ञानाचे ।।२।।
कर्म माझा धर्म आणि
धर्म माझ्या अंतरंगी
लक्षणांचे तुम्हा दिखावे
पाठपूजा सर्व सोंगी ।।३।।
युक्तीच्या सांगीन गोष्टी
अन् गीतेचे अध्यायही
व्यर्थ सारे कर्मच्युता
सांडिला जर स्वाध्यायही ।।४।।
घेतले जे कर्म हाती
तेच अर्पि ईश्वरासी
जिंकले त्या मानवाने
ऐहिकाच्या नश्वरासी ।।५।।
स्वाध्यायान्मा प्रमदः
कृण्वन्तु विश्वमार्यम्
सर्वेSपि सुखिनः सन्तु
अमृतस्य पुत्रोSहं ।।६।।
दीव्यशलाका घेऊनी या
उजळु अवघे नभोमंडल
स्वकर्माचे आज्य अर्पुनी
उत्थानाचे चेतवु स्थंडिल ।।७।।
समाजसागर घुसळुनिया
भक्तीक्रांतीचे क्षीरमंथन
अनंताच्या असीम वक्षी
प्रेमाचे अनाहत स्पंदन ।।८।।
युगात्म्याच्या ह्रन्मालेतील
अंश मिळावा स्पंदनाचा
रजःकण अमुचे जीवन त्यांचा
देह झाला चंदनाचा ।।९।।
===============================
सारंग भणगे. (7 जानेवारी 2009)
साहित्य प्रकार:
कविता
Sunday, January 4, 2009
माझ्याच कविता
माझ्याच कविता
माझ्याच वेदनेने मी गर्भार झालो
मलाच प्रसवल्या माझ्याच कविता
स्तनी दाटले शब्ददूध माझ्या
अशा पोसल्या मी माझ्याच कविता
क्रंदती मध्यराती बाळ नाठाळ हे
मग कोसल्या मी माझ्याच कविता
भुकेस भावनांचे अन्न भरविले
अशा तोषल्या मी माझ्याच कविता
पुन्हा वेदनेचे वीर्य सांडिले आत
अशा जोपासल्या मी माझ्याच कविता
===============================
सारंग भणगे. (2 जानेवारी 2009)
माझ्याच वेदनेने मी गर्भार झालो
मलाच प्रसवल्या माझ्याच कविता
स्तनी दाटले शब्ददूध माझ्या
अशा पोसल्या मी माझ्याच कविता
क्रंदती मध्यराती बाळ नाठाळ हे
मग कोसल्या मी माझ्याच कविता
भुकेस भावनांचे अन्न भरविले
अशा तोषल्या मी माझ्याच कविता
पुन्हा वेदनेचे वीर्य सांडिले आत
अशा जोपासल्या मी माझ्याच कविता
===============================
सारंग भणगे. (2 जानेवारी 2009)
साहित्य प्रकार:
कविता
सासरेबुवा
वसंताचे ॠतुवैभव गाती जन हे बहुत जरी
हेमंताची ॠतुॠजुता ऐकुन घ्या हो बहुत खरी
खडकावरती आम्रतरुचा अंकुर जसा कधी फ़ुटावा
उजाड उभ्या माळावरती पारीजात कि जणु फ़ुलावा
पानावरच्या दंवबिंदुंचे मार्दव त्यांनी टिपले का?
पुष्पअंतरी मकरंदासम मधुर नाते जपले का?
शांत वनाची मृदुल छाया घरट्यावरती धरली अशी
रीती रांजणे माया ममता आपुलकीने भरली अशी
सदा वत्सल काळिज कोमल शब्द परी अबोल झाले
गुलाब सुंदर काट्यांमधुन कमळ कर्दमी जसे निघाले
या परी आता बोल न उरले शब्द संकुचित झाले गा!
षष्ट्याब्दीच्या शुभमुहुर्ती अभिष्टचिंतन केले गा!
================================================
सारंग भणगे. (4 जानेवारी 2009)
हेमंताची ॠतुॠजुता ऐकुन घ्या हो बहुत खरी
खडकावरती आम्रतरुचा अंकुर जसा कधी फ़ुटावा
उजाड उभ्या माळावरती पारीजात कि जणु फ़ुलावा
पानावरच्या दंवबिंदुंचे मार्दव त्यांनी टिपले का?
पुष्पअंतरी मकरंदासम मधुर नाते जपले का?
शांत वनाची मृदुल छाया घरट्यावरती धरली अशी
रीती रांजणे माया ममता आपुलकीने भरली अशी
सदा वत्सल काळिज कोमल शब्द परी अबोल झाले
गुलाब सुंदर काट्यांमधुन कमळ कर्दमी जसे निघाले
या परी आता बोल न उरले शब्द संकुचित झाले गा!
षष्ट्याब्दीच्या शुभमुहुर्ती अभिष्टचिंतन केले गा!
================================================
सारंग भणगे. (4 जानेवारी 2009)
साहित्य प्रकार:
कविता
तृषार्त
काजळघोट अंधारात
मिणमिणती चिमणी
थरथरत्या ओंजळीत
पीवळं पीवळं पाणी
सुरुकुतल्या आसवांत
सुकलेला कोंब
उजाड शीवारात
उलट्या हाताची बोंब
नुसतं वाळवंट
अफ़ाट फ़ुटलेलं
निवडुंगाखाली
आभाळ दाटलेलं
गोठ्यातले बैल
घासतात खुरं
बामनाच्या ताम्हणास
फ़सतात गुरं
छपराचं फ़ुटकं खापर
रांजणाला चिरा
भावकितल्या आडात
शेवाळला झरा
चूल विझलेली
कवाची उपाशी
वाळक्या पोराला
गुंजभर लापशी
विहिरतळाशी बेडकं
मोकाट फ़िरतात
उताण्या मोटा
स्वप्नात झुरतात
ओशाळली पहाट
दमानंच उठते
किरणांच्या थारोळ्यात
डबकुले नटते
उर्मट ऊन्हाची
ऊठली काहिली
म्हाता-यानं दुपार
शेवटचीच पाहिली
म्हाता-याच्या तिरडीला
तेरडाही महाग
जळलेल्या देहाला
तहानेचीच आग.
===============================
सारंग भणगे (4 जानेवारी 2009)
मिणमिणती चिमणी
थरथरत्या ओंजळीत
पीवळं पीवळं पाणी
सुरुकुतल्या आसवांत
सुकलेला कोंब
उजाड शीवारात
उलट्या हाताची बोंब
नुसतं वाळवंट
अफ़ाट फ़ुटलेलं
निवडुंगाखाली
आभाळ दाटलेलं
गोठ्यातले बैल
घासतात खुरं
बामनाच्या ताम्हणास
फ़सतात गुरं
छपराचं फ़ुटकं खापर
रांजणाला चिरा
भावकितल्या आडात
शेवाळला झरा
चूल विझलेली
कवाची उपाशी
वाळक्या पोराला
गुंजभर लापशी
विहिरतळाशी बेडकं
मोकाट फ़िरतात
उताण्या मोटा
स्वप्नात झुरतात
ओशाळली पहाट
दमानंच उठते
किरणांच्या थारोळ्यात
डबकुले नटते
उर्मट ऊन्हाची
ऊठली काहिली
म्हाता-यानं दुपार
शेवटचीच पाहिली
म्हाता-याच्या तिरडीला
तेरडाही महाग
जळलेल्या देहाला
तहानेचीच आग.
===============================
सारंग भणगे (4 जानेवारी 2009)
साहित्य प्रकार:
कविता
Saturday, January 3, 2009
झालो मी अवकाश
तुटले कर्मबंध पाश,
झालो मी अवकाश..
तिमीराच्या अंतर्यामी
प्रकटला प्रकाश..
झालो मी अवकाश.
देह झाला गौण
शब्द झाले मौन
क्षण एक जवळि आला,
कैवल्य गतिमोक्ष...
झालो मी अवकाश.
फ़िटले मायाग्रहण वेध
निर्मम जाहलो निर्वेध
अंतरात चिन्मय खुलले,
चिरंतन चिदाकाश...
झालो मी अवकाश.
=============================
सारंग भणगे. (डिसेंबर 2008)
झालो मी अवकाश..
तिमीराच्या अंतर्यामी
प्रकटला प्रकाश..
झालो मी अवकाश.
देह झाला गौण
शब्द झाले मौन
क्षण एक जवळि आला,
कैवल्य गतिमोक्ष...
झालो मी अवकाश.
फ़िटले मायाग्रहण वेध
निर्मम जाहलो निर्वेध
अंतरात चिन्मय खुलले,
चिरंतन चिदाकाश...
झालो मी अवकाश.
=============================
सारंग भणगे. (डिसेंबर 2008)
साहित्य प्रकार:
कविता
Subscribe to:
Posts (Atom)