थोडा उजेड होता थोडी पहाट होती
तेजात भास्कराच्या उषा नहात होती
धाऊन सप्तवारू, उधळीत प्रकाश मोती
सहस्त्र किरणांच्या, उजळल्या अगणित ज्योती
क्षितीज तांबडे फ़ुटती, रंगात रंगीत रंगती
गगनाची निळी दुपटी, रविबाळ हासत रांगती
सकाळ झाली गोमटी, सुटली आकाशमिठी
लाजत पुर्वा दिठी, आरक्त होऊनि उठी.
==========================
सारंग भणगे. (डिसेंबर 2008)
No comments:
Post a Comment