तुटले कर्मबंध पाश,
झालो मी अवकाश..
तिमीराच्या अंतर्यामी
प्रकटला प्रकाश..
झालो मी अवकाश.
देह झाला गौण
शब्द झाले मौन
क्षण एक जवळि आला,
कैवल्य गतिमोक्ष...
झालो मी अवकाश.
फ़िटले मायाग्रहण वेध
निर्मम जाहलो निर्वेध
अंतरात चिन्मय खुलले,
चिरंतन चिदाकाश...
झालो मी अवकाश.
=============================
सारंग भणगे. (डिसेंबर 2008)
No comments:
Post a Comment