उठे पापणी जशी उठावी गझल
फ़ुटे स्मित ऐसे कि फ़ुटावी गझल
तुझे लाजणे अन् मला पाहणे
अशी स्फ़ुरणे, कि सुचावी गझल.
रंगात न्हाली ही पहाट झाली
आरक्त गाली कि फ़ुलावी गझल.
रजई धुक्याची दुलई दंवाची
मलई मिलनाची ही व्हावी गझल.
उरी स्पंद वेडे श्वास मंद सोडे
असा गंध ओढे कि निसटावी गझल.
पहाटे पहाटे कोवळ्या पहाटे
रोजच्या पहाटे ही स्फ़ुरावी गझल.
==============================
सारंग भणगे. (9 जानेवारी 2008)
No comments:
Post a Comment