एक टिंब...पूर्णत्वाचं
अन् बेसुमार पसरलेलं अवकाश
टिंबातलं चैतन्य
आणि
अनिवार पसरलेला प्रकाश
टिंबांचं अवकाश....कि
टिंबातलं अवकाश
कि...
अवकाशातले टिंब....
थेंबातला गंगासागर
निमिषाचं मन्वंतर
मग,
'तु'
टिंब
कि
अवकाश?
=======================
सारंग भणगे. ( 10 जानेवारी 2009)
No comments:
Post a Comment