वसंताचे ॠतुवैभव गाती जन हे बहुत जरी
हेमंताची ॠतुॠजुता ऐकुन घ्या हो बहुत खरी
खडकावरती आम्रतरुचा अंकुर जसा कधी फ़ुटावा
उजाड उभ्या माळावरती पारीजात कि जणु फ़ुलावा
पानावरच्या दंवबिंदुंचे मार्दव त्यांनी टिपले का?
पुष्पअंतरी मकरंदासम मधुर नाते जपले का?
शांत वनाची मृदुल छाया घरट्यावरती धरली अशी
रीती रांजणे माया ममता आपुलकीने भरली अशी
सदा वत्सल काळिज कोमल शब्द परी अबोल झाले
गुलाब सुंदर काट्यांमधुन कमळ कर्दमी जसे निघाले
या परी आता बोल न उरले शब्द संकुचित झाले गा!
षष्ट्याब्दीच्या शुभमुहुर्ती अभिष्टचिंतन केले गा!
================================================
सारंग भणगे. (4 जानेवारी 2009)

No comments:
Post a Comment