माझ्याच कविता
माझ्याच वेदनेने मी गर्भार झालो
मलाच प्रसवल्या माझ्याच कविता
स्तनी दाटले शब्ददूध माझ्या
अशा पोसल्या मी माझ्याच कविता
क्रंदती मध्यराती बाळ नाठाळ हे
मग कोसल्या मी माझ्याच कविता
भुकेस भावनांचे अन्न भरविले
अशा तोषल्या मी माझ्याच कविता
पुन्हा वेदनेचे वीर्य सांडिले आत
अशा जोपासल्या मी माझ्याच कविता
===============================
सारंग भणगे. (2 जानेवारी 2009)
No comments:
Post a Comment