Tuesday, September 1, 2009

सखे कविता नको सोडूस

_________________
नाती नाळेची नको तोडूस
सखे कविता नको सोडूस
काळजात रेघा नको ओढूस
सखे कविता नको सोडूस

पोटचा पोर; दाव्याचं ढोर
कधी कुणी सोडतं का?
कुंकवाचा गोल; मायेचा बोल
कधी कुणी मोडतं का?

घरची चुल नको मोडूस
सखे कविता नको सोडूस

चोचीतला चारा; ग्रीष्मातला वारा
कधी कुणी सोडतं काय?
गुळातली गोडी; पाण्यातून होडी
कधी कुणी काढतं का?

मेघातलं पाणी नको काढूस
सखे कविता नको सोडूस.
======================
सारंग भणगे. (1 सप्टेंबर 2009)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...