Thursday, January 19, 2012

नगमा

तेरी आँखोंसे चुराके नमी
लिख दी है मैंने ऐसी कविता,
पढ़के न बह जाए कही
तेरे नैनो से सावन की सरिता.

चुराके लबो से लाली ए कातिल
अल्फाज लिखे है ऐसे क्या कहू,
तुझे लगे माथे का सिंदूर
है मैंने बहाया रगों से लहू.

लेके तेरे गोरे रंग की स्याही
कुछ नगमा मैंने ऐसा लिख डाला,
सूरज डूबा जब पर्बत के पीछे
फैला है फिर भी चाहू ओर उजाला.

खुशबू चुराके सासों से तेरी
लिखी जो नज्मे हवाओ के ऊपर,
पढ़ने उसे हवाओ में उड़ते
धरती पे आये अम्बर से इश्वर.
=====================
सारंग भणगे. (१९ जानेवारी २०१२)

Monday, January 9, 2012

जीवनभिक्षा

तृषार्त नदीची जीवनभिक्षा
तुडुंब तोय तरी तितिक्षा
सूर्य परंतु अस्तंगत मी
अस्तित्वाची मला प्रतिक्षा.

भग्न नगरी सुंदर वेशी
नंदनवन हे तरी उपाशी
जळात रहावे राजहंस नि
चातक पाही रूक्ष अकाशी.

छाया-वड तो उन्हात जळतो
पाऊस धो धो पुरात गळतो
अवर्षणकाळी माध्यान्हीला
कृष्णमेघ वेडावुनी पळतो.

अमाप मोहर झडून गेला
पाऊस अकाली पडून गेला
डोंब मेला प्रेताचा त्या
सांगाडाही सडून गेला.

- सारंग भणगे

Tuesday, January 3, 2012

प्रेमकहाणी


पाण्यावरती लिहून टाकू प्रेमकहाणी राणी ग,
वाचून येईल डोळ्यांना त्या पाण्याच्याही पाणी ग.

वाचू नये हि प्रेमकहाणी; म्हणून लिहिली पाण्यावरती,
तरी हुंदके उरी फुटवे पाण्याला या गाण्यावारती,
वा-यावरती विरून जावी विरहाची विराणी ग.
वाचून येईल डोळ्यांना त्या पाण्याच्याही पाणी ग. II१II

दैवाने ना कुणास द्याव्या अशा वेदना अशी वंचना,
काळीज तुटल्या कलेवरांना जगवायच्या मरण यातना,
स्वप्नकळ्यांना चिरडून गेली सटवाई ती अनवाणी ग.
वाचून येईल डोळ्यांना त्या पाण्याच्याही पाणी ग. II२II

हाय दुर्दशा वर्षाकाळी उत्सव व्हावा पानगळीचा,
क्षितीजानेही नकार द्यावा भेटीला त्या नभ-धरतीच्या,
सरणावरची राख प्रीतीची अखेरची ती निशाणी ग.
वाचून येईल डोळ्यांना त्या पाण्याच्याही पाणी ग. II३II
=====================================
सारंग भणगे (४ जानेवारी २०१२)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...